सांगली : गृहराज्यमंत्री दीपक केसकर यांनी सांगलीत अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कोथळे कुटुंब प्रचंड आक्रमक झाले होते.
पीएसआय युवराज कामटेसह आणखी काही वरिष्ठ अधिकारी यात आहेत, त्यांच्यावर कारवाई होऊन न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करेल, असा इशारा अनिकेतची पत्नी आणि भावानं गृहराज्यमंत्र्यांना दिला.
दरम्यान, मारहाण आणि खून प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करु असं आश्वासन त्यांनी कोथळे कुटुंबाला दिलं. पीएसआय कामटेबाबत वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं असेल तर यासंदर्भात चौकशी केली जाईल तसंच प्रशासनातील त्रुटींबाबत स्वतंत्र अधिकारी नेमून पूर्ण चौकशी केली जाईल' असंही ते म्हणाले.
दरम्यान, आज अनिकेत कोथळे यांच्या मृत्यूप्रकरणी, सांगली बंद ठेवण्यात आलं, सांगली बंदला सर्वपक्षीय हाक देण्यात आली आहे. यावेळी मोटारसायकल रॅली देखील काढण्यात आली.अनिकेत कोथळेच्या मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन बाबी समोर येत आहेत.