सांगली : जिल्ह्यातील आजची कोरोना (Coronavirus) रुग्ण स्थिती काल एका दिवसात 1150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोना मुळे 33 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितिला 11378 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 55710 ठणठणीत बरे झाले आहेत. दरम्यान, जिल्हा क्षय रुग्णालयातील नर्स रेखा कुरणे ( 44) यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या विश्रामबाग येथील पोलीस रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. कुरणे यांच्या घरातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह होते. तसेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा क्वारन्टाईन सेंटरमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.
रेखा कुरणे याना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र तेथे व्हेंटिलेटर नसल्याने, त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते, मात्र येताना रस्त्यातच त्यांचं निधन झाले. वेळेत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा क्वारन्टाईन सेंटरमध्येच मृत्यू
एक धक्कादायक घटना घडली आहे. वेळेत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा क्वारन्टाईन सेंटरमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडलीय. सोलापूर महानगरपालिकेच्या सिंहगड महाविद्यालयातील क्वारन्टाईन सेंटरमध्ये 19 एप्रिल रोजी एका रुग्णास भरती करण्यात आले होते. शनिवारी मात्र या रुग्णाची ऑक्सिजनची पातळी खालवली होती. या क्वारन्टाईन सेंटरमधील डॉक्टरांनी रुग्णाला व्हेंटिलेटर बेडची गरज असल्याची माहिती नातेवाईकांना कळवली होती. तसेच स्वत: देखील बेड उपलब्ध करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र कुठे ही बेड उपलब्ध झालं नसल्याची माहिती समोर येत आहे.
यातच रुग्णाची परिस्थिती खालावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. दरम्यान क्वारन्टाईन सेंटरमधील इन्चार्ज यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेडची गरज असल्याचे कळविणे गरजे होते. मात्र तशी कोणतिही माहिती संबंधितानी वरीष्ठापर्यंत पोहोचवली नाही. त्यामुळे क्वाँरन्टाईन सेंटरमधील घटनेशी संबधिताची चौकशी कऱण्यात येणार असल्याची माहिती देखील पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.