राज्यसभेसाठी भाजपला घोडेबाजार करायचा आहे - संजय राऊत

Rajya Sabha elections News : राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे, त्यांना (भाजपला) या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे, असे दिसत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. ( Sanjay Raut on BJP)  

Updated: May 31, 2022, 01:06 PM IST
राज्यसभेसाठी भाजपला घोडेबाजार करायचा आहे  - संजय राऊत title=
संग्रहित छाया

मुंबई : Rajya Sabha elections News : राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे, त्यांना (भाजपला) या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे, असे दिसत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. ( Sanjay Raut on BJP) खरं तर त्यांच्याकडे एवढी मतं नाहीत. जर मतं असती तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली असती, असे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut's criticism of BJP from Rajya Sabha elections)

भाजपचे नाव न घेता संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यांनी (भाजप) आधी छत्रपती संभाजीराजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्‍यावर सोडलं आणि कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटला उमेदवारी दिली, अशी टीका राऊत यांनी केली.

भाजपचं आश्चर्य वाटतं. भाजपचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. जे भारतीय जनता पार्टीची निष्ठावान आहेत. जे संघ परिवाराशी संबंधित आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले आहेत त्यांना डावलण्यात आल्याचे मी वाचले. इतर पक्षातून आले आहेत आणि जे फक्त शिवसेना आणि महा विकास आघाडीवर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे, असे राऊत म्हणाले.

 त्यामुळे भाजपमध्ये फार नाराजी आहे असं माझ्या वाचनात आणि पाहण्यात येत आहे. भारतीय पक्ष आता जुना राहिलेला नाही अशाच बाहेरचा लोकांनी येऊन हा पक्ष ताब्यात  घेतला आहे. आम्ही शिवसेनेतून आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पुढील पंचवीस वर्षे राहणार !

 सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया ताई सुळे यांचा देखील हेच म्हणणे आहे की, हेच मुख्यमंत्री पुढील पंचवीस वर्षे राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोकं निर्माण करत असतात सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे.  महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आणि स्वतः शरद पवार अजित पवार सोनिया गांधी राहुल गांधी हे उद्धवजींच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे हा प्रश्न जाने निर्माण केला असेल त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे ते म्हणाले.

 दरम्यान,  ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा न्यायालयात आहे आणि त्यावर मी आता भाष्य करणार नाही, असे राऊत सांगत बोलण्याचे टाळले. आठ जून ला होणारी संभाजीनगर येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि या सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असा दावा त्यांनी केला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x