परळीत नाथ फेस्टिव्हलमध्ये सपना चौधरीचे ठुमके

डान्सर सपना चौधरी हिने परळीच्या नाथ फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. 

Updated: Sep 18, 2018, 07:51 PM IST
परळीत नाथ फेस्टिव्हलमध्ये सपना चौधरीचे ठुमके title=

बीड : हरियाणातील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिने परळीच्या नाथ फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सव साजरा केला जातोय. दहा  दिवस चालणाऱ्या उत्सवात आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. युट्यूबवर धुमाकूळ घालणाऱ्या सपना चौधरी हिच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

'तेरी अँखो का ये काजल' या गाण्यावरील डान्स पाहण्यासाठी परळीकरांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सूज्ञ बीडकरांनी अशा कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त करत ही मराठवड्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. गर्दी गोळा करण्याकरता अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगणांची नृत्य ठेवण शोभनीय नाही, अशी टीका केली आहे. दहीहंडी असो की असे सांस्कृतीक महोत्सव यात महिलांची अशी नृत्ये पाहता महाराष्ट्रात चाललय काय राजकीय मंडळी गर्दी खेचण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याची चर्चा आहे.

राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावतीने परळी येथे दरवर्षी नाथ फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. मात्र अशाप्रकारचा हा नृत्याचे कार्यक्रम आयोजन करुन नाथ फेस्टिव्हलचा नाच फेस्टिव्हल तर झाला नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय. भाजपा नेते सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणावरुन धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.