विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक...'असे करणारा मी पहिला भारतीय..'

Abhijeet Bichukale Milking Ceremony: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 28, 2023, 12:18 PM IST
विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक...'असे करणारा मी पहिला भारतीय..' title=

Abhijeet Bichukale Milking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. संसदेची इमारत साधारण 100 वर्षे जुनी असून त्यात खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. दरम्यान नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. या दोन घटनांचा एकमेकांशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून सातारा येथे अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. नव्या संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली होती. यामुळे साताऱ्यातील आरपीआय गटाने हा निर्णय घेतला.  भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहाला बाबासाहेबांचे नाव देणारा नेता, अभिनेता हा सातारा जिल्ह्यातील सुपुत्र आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

या दुग्धाभिषेकानंतर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात नवी संसद उभारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव नव्या संसदेला द्यावे, असे पत्र मी पंतप्रधान मोदींना लिहिले. अशी मागणी करणारा मी पहिला भारतीय आहे. यामुळे माझ्या नकळत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने माझा दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. दुग्धाभिषेकाला स्मरुन मी सांगतो, माझा लढा सुरु झाला आहे. नवीन संसद भवनाला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, यासाठी मी उरुन पुरुणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिजित बिचुकले यांचे कौतूक केले जात आहे. आज अभिजीत बिचुकले सारख्या नेतृत्वाची देशाला आणि लोकशाहीला वाचवू शकते, अशा कमेंट लिहिल्या गेल्या आहेत. 

तसेच मागणी खूप सुंदर आहे. नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच नाव दिलं पाहिजे. पण त्यांच्याच पुतळ्यासमोर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर दूध टाकून असा अभिषेक करणे हे चुकीचे आहे. नक्कीच तुमच्या मागणीला यश लाभो ही प्रार्थना करतो. पण कृपया करून बाबासाहेबांचे नाव घेऊन अशी स्टंटबाजी करू नये, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने लिहिली आहे.