अनैतिक संबंधात अडथळा ठरला आणि तरुणाचा काटा काढला

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाला संपवलं

Updated: Jun 4, 2022, 08:28 AM IST
अनैतिक संबंधात अडथळा ठरला आणि तरुणाचा काटा काढला title=

तुषार तपासे, झी 24 तास सातारा : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कराड तालुक्यातील वहागाव परिसरात घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एकाचं आयुष्य संपवलं. 

हत्येनंतर तब्बल 7 दिवसांनी एका शेतात पुरलेला मृदेह पोलिसांना शोधण्यात यश आलं आहे. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने उकरून बाहेर काढला आहे.

बरकत पटेल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नांव असून या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तळबीड पोलीस या गुन्हाचा तपास करत आहेत.