VIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे

Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...   

Updated: Jan 17, 2023, 08:43 AM IST
VIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे  title=
satara panchgani might experience Joshimath Sinking like incident read details latest Marathi news

Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये जोशीमठ (Joshimath Sinking news ) शहराच्या वाईट अवस्थेमुळं अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. एक संपूर्ण शहर उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळं निसर्गावर आघात केल्यास तो कशा प्रकारे उत्तर देतो याचीच प्रतीची अनेकांना येत आहे. (uttarakhand) उत्तराखंडमधील अलकनंदा नदीच्या काठावर वसलेल्या जोशीमठ या शहराला निसर्गानं सढळ हस्ते खुपकाही दिलं. पण, मानवी हव्यासापोटी निसर्गाचाच ऱ्हास झाला आणि जोशीमठ लयास जाण्यास सुरुवात झाली. शहरात अनेक ठिकाणी सातत्यानं होणारं भूस्खलन, एकमेकिंकडे झुकणाऱ्या इमारती आणि अनेक बांधकामांना जाणारे तडे पाहता सध्या इथं भीतीचं वातावरण आहे. 

महाराष्ट्रात जोशीमठ व्हायला वेळ लागणार नाही (Joshimath Sinking and Maharashra )

ज्याप्रमाणं हिमालयाच्या (Himalayan Ranges) कुशीत असणाऱ्या जोशीमठमध्ये भूस्खलन झालं, तशाच प्रकारे महाराष्ट्रात असणाऱ्या (Satara Panchgani) साताऱ्यातील पाचगणीमध्येही परिस्थिती ओढावू शकते. जोशीमठ आणि पाचगणीच्या भूभागामध्ये साधर्म्य असल्याचं म्हणत तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केली आहे. 

मानवी हस्तक्षेपामुळं पाचगणीमध्ये डोंगरउतारांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम होताना दिसत आहे. पाचगणीचा घाट सुरु होतो तिथपासून इथं डोंगरउतारावर दरीच्या दिशेनं असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेलं आहे. पाचगणीपासून थेट (Bhilar, Bhose) भिलार, भोसेपर्यंत हे बांधकाम झालेलं दिसतं असून यामध्ये हॉटेल्स आणि स्थानिकांच्या घरांचा समावेश आहे. तिथून पुढंही हीच परिस्थिती. त्यामुळं इथं भूस्खलन झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भागात सातत्यानं वाढणारं बांधकाम आणि होत असणारा मानवी हस्तक्षेप थांबवला नाही, तर इथंही जोशीमठ व्हायला वेळ लागणार नाही अशीच चिंता व्यक्ती केली जात आहे. 

प्रशासनाला जाग येणार का? 

मुख्य म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होईल अशा या बांधकामांना इथं परवानगी देतंय तरी कोण हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आता मुद्दा असा, की जोशीमठमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासनानं यात लक्ष घातलं. पण, महाराष्ट्रात मात्र हातात बरीच वेळ असताना ही बाब लक्षात आल्यामुळं आता या बांधकामांवर चाप बसणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

जोशीमठमधील परिस्थिती दिवसागणिक आणखी बिघतेय... (Joshimath latest news)

कधी एकेकाळी पर्यटनासाठी अनेकांचीच पसंती असणाऱ्या जोशीमध्ये आजच्या दिवशी परिस्थिती प्रचंड बिघडलेली आहे. इथं प्रत्येजण जीव मुठीत घेऊन वावरत आहे. अनेकांनी इथून स्थलांतरही केलं आहे. आतापर्यंत इथं जवळपास 800 इमारती आणि घरांना तडे गेले आहेत. तर काही भागांमध्ये जमीन खचली आहे. (ISRO) इस्रोकडूनही जोशीमठ खचत अल्याची विदारक छायाचित्र काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. 

हेसुद्धा वाचा : Joshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे

 

जोशीमठ इतकं लोकप्रिय का? 

गेल्या साधारण दोन दशकांपासून जोशीमठमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. उत्तराखंडमध्ये असणाऱ्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी हे एक. हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या (Char Dham Yatra) चारधामपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ धामच्या (Badrinath Dham) दिशेनं जाणारी वाट जोशीमठ येथूनच सुरु होते. त्यामुळं इथं येणाऱ्यांची संख्या तुलनेनं जास्त. सूत्रांच्या माहितीनुसार इथं 20 हजार इतकी मूळ स्थानिक रहिवाशांची संख्या आहे. पर्यटनावर इथं अनेक आर्थिक उलाढाली होत असत, पण आता मात्र वाढता मानवी हस्तक्षेप आणि वीजनिर्मिती प्रकल्पांसाठीचं बांधकाम, बोगद्यांसाठी पोखरलेली जमी आणि काही अंशी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं जोशीमठ लयास जात आहे हेच बोचरं सत्य.