close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा

सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Updated: May 12, 2019, 06:56 PM IST
'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा

सातारा : सरकारनं दुष्काळाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही, तर या सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. तसंच शेतकर्‍यांना प्रत्येक जनावरामागे सव्वाशे रुपये अनुदान मिळावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या शेतकऱ्याला जनावरामागे ९० रुपये अनुदान मिळतं. शरद पवारांनी साताऱ्यातल्या चारा छावणीला भेट दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, असं शरद पवार यांनी याआधीच सांगितलं होतं. ज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मागच्याच आठवड्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

मुंबईच्या बैठकीनंतर काय म्हणाले होते शरद पवार?

- राज्यात दुष्काळी स्थिती परतीचा पाऊस अनेक जिल्ह्यात पडला नाही त्यामुळे निर्माण झाली आहे
- दुष्काळात पिण्याचं पाणी, लोकांना रोजगार, पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या याची व्यवस्था सरकारला करावी लागते
- दुष्काळात फळबाग गेली तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते
- या दुष्काळात राज्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिष्टमंडळासह त्यांना भेटतील
- आमच्या काळात काय उपाययोजना केल्या जातील याची माहिती दिली जाईल
_ आमचे सरकार असताना फळबागा वाचवण्यासाठी अनुदान दिले होते
- फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे ही मागणी
- चारा छावण्यात पूर्वी सरसकट जनावरं घेतली जात होती, आता पाचच जनावरं घेतली जातात ही अट काढावी
- चारा छावणीत ९० रुपये जनावारे मागे दिले जातात, ते वाढवावे
- सध्या जनावरांना ऊसाचं वाडं चारा म्हणून दिलं जातं, त्याबरोबर हिरवा चारा, पेंड उपलब्ध करून द्यावी 
- सर्व प्रकारच्या वसुली थांबवण्याचा निर्णय सरकारने घ्यावा
- शेतकर्यांने घेतलेलं कर्ज तो फेडू शकत नाही त्यामुळे कर्जमाफी आणि पुनर्गठण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल
- जूनमध्ये शालेय, महाविद्यालयीन प्रवेश सुरू होतील त्यामुळे प्रवेश फी माफी द्यावी
- विद्यार्थ्यांना दोन वेळ जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही दुष्काळात घेतला होता, तसा निर्णय घ्यावा

- दुष्काळात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, तालुका अध्यक्ष, विद्यार्थी संघटना काम करतील

- मी दुष्काळी दौर्‍यावर गेलो नसतो तर सरकारच्या बैठका झाल्या नसत्या, मंत्र्यानी दौरे केले नसते 
- आता तडफडणारे पशुधन वाचवा

- निवडणूक आयोगाकडे आम्ही फोनवर माहिती द्यायचो दुष्काळातील कामं करायची आहेत, निवडणूक आयोग दोन ते तीन तासात परवानगी द्यायचे 
- निवडणूक आयोगातील नियमावली दुष्काळी कामात आड येत नाही