Bank Job: एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज

SBI Job:  एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 27, 2024, 01:42 PM IST
Bank Job: एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज title=
एसबीआय बॅंक भरती

SBI Job: आपल्या देशात बॅंकेतली नोकरी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. चांगले पद, पगार आणि सुट्ट्या अशा सुविधांमुळे तरुण बॅंक नोकरीकडे वळताना दिसतात. अनेकजण पदवीच्या शिक्षणानंतर याची तयारी करताना दिसतात. बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा तपशील देण्यात आला आहे. 

पदभरतीचा तपशील

एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. एसबीआय भरती अंतर्गत एकूण 171 पदे भरली जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सिक्युरिटी अँड स्पेशल प्रोजेक्ट्स) चे 1 पद,DGM (घटना प्रतिसाद) चे 1 पद, सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) ची 42 पदे, असिस्टंट मॅनेजर(इंजिनियर-इलेक्ट्रिकल) ची 25 पदे, असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर)ची 101 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) (अनुशेष) चे 1 पद भरले जाणार आहे. 

पात्रता

जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सिक्युरिटी अँड स्पेशल प्रोजेक्ट्स)साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 ते 50 वर्षांदरम्यान असावे. डीजीएम पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे ते 50 वर्षे असावे. सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) पदासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्या असावे. सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-इलेक्ट्रिकल) पदासाठी 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यानचे उमेदवार अर्ज करु शकतात. असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर) साठी 21 वर्षे ते 40 वर्षे आणि सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) (अनुशेष) साठी उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्षेांदरम्यान असावे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. 

किती असेल अर्ज शुल्क?

एसबीआय भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/EWS/OBC उमेदवारांकडून  750 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एसएसी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 

कधीपर्यंत कराल अर्ज?

12 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. या तारखेनंतर आलेले स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन 1 पाहण्यासाठी क्लिक करा

पदभरतीचे नोटिफिकेशन 2 पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा