धुळे : धुळे शहारात एका शाळकरी मुलीचा बेशिस्त वाहतुकीने बळी घेतला आहे. साक्री रस्त्यावरील भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गुंजन देविदास पाटील या शाळकरी मुलीला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. गुंजन कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी असून नववीत शिकत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रकचालक स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.
दरम्यान, गुंजन हिची शाळा दुपारची असल्याने सकाळी ती क्लास जात असल्याचे सांगण्यात आले. या अपघातामुळे मात्र पुन्हा बेशिस्त वाहतुकीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.