वैद्यकीय क्षेत्राला मलीन करणारी अतिशय गंभीर बाब

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती समाजासमोर आणणाऱ्या साथी संस्थेच्या अहवालाची इंडियन मेडिकल असोसिएशनकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Updated: Dec 14, 2019, 12:04 AM IST
वैद्यकीय क्षेत्राला मलीन करणारी अतिशय गंभीर बाब

पुणे : वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती समाजासमोर आणणाऱ्या साथी संस्थेच्या अहवालाची इंडियन मेडिकल असोसिएशनकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. औषध निर्मिती कंपन्यांकडे मनोरंजनासाठी अभिनेत्रींची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती साथीच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. 

ही बाब अतिशय गंभीर असून वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलीन करणारी असल्याचं आयएमएनं म्हटलंय. दरम्यान, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.