संकुचित विचाराने सत्ताधार्यांनी वागता कामा नये - शरद पवार

शरद पवार यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. 

Updated: Sep 3, 2018, 08:43 AM IST

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्धघाटन प्रसंगी पवार यांनी राज्यकर्त्यांना कोपरखड्या मारत, देशात मर्यादित विचार येतो आहे कि काय ? असा प्रश्न पवारांनी यावेळी उपस्थित केला.

सत्ताधाऱ्यांना टोला 

भारतासारख्या खंडप्राय देशात सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन पुढे नेले पाहिजे तरच सर्व घटकांचा देशाच्या विकासात उपयोग करत येईल असे पवार यांनी यावेळी सांगितले. संकुचित विचाराने सत्ताधार्यांनी वागता कामा नये असा सल्ला वजा समज ही पवारांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता दिली.