Sharad Pawar press conference : सत्ताधाऱ्यांच्या हातात यापुढे सत्ता राहणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेवर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Political News) सी-व्होटर सर्व्हे दिशादर्शक असल्याचं पवार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा प्रस्ताव आला नाही म्हणून चर्चा नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले आहे. तसेच कोणतीही दुफळी नसून महाविकास आघाडी एकसंध असल्याचेही पवार म्हणाले.
सी-व्होटरच्या सर्व्हेने दिशा दाखवली आहे. सत्ताधाऱ्यांसोबत बहुमताचा आकडा नाही, असे पवार म्हणाले. तसेच शिवसेना आणि वंचितमध्ये वाद आहे हे मला माहित नाही, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आंबेडकर यांना सल्ला दिला होता. अशी टीका करणे टाळा, असे म्हटले होते. त्यानंतर कोण संजय राऊत अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली होती. त्यानंतर पवार यांनी भाष्य केले आहे. आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला नाही. आम्ही त्या चर्चेत सहभागी नव्हतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे.
वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी यावेळी मांडली.
- पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली कशाला काढायचा तो प्रश्न?
- सत्ताधारी मंडळींच्या विरोधात जनमत आहे, सर्व्हेमधून असंच दिसत आहे
- कर्नाटकात भाजपचे राज्य राहणार नाही असं आता दिसत आहे
- विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे पण अजून कोणताही पक्का निर्णय झाला नाही
- प्रत्येक राज्यात वेगवेगळे इशू आहेत ते सोडवावे लागतील
- विरोधकांचा डायलॉग दिल्लीत सुरू होईल
- ममता यांचा सत्ताधाऱ्यांविरोधातील विरोध कमी झालेला नाही,पण त्यांच्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणा लावली जात आहे
- आगामी निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत
- आमची अजून वंचीत बाबत चर्चा झाली नाही
- आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत
- तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचं दिसून येत आहे
- पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चंद्रकांत पाटील कुणाला पत्र लिहिणार आहेत ते माहीत नाही
- कोल्हापूरमध्ये देखील पोटनिवडणूक झाली होती ना?
- पंढरपूरला झाली होती आताच कसे यांचा सुचलं काही कळत नाही
- आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आमच्यात समन्वय आहे काही काळजी करू नये
- लोकप्रतिनिधी फोडण्याची पावलं शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत, पण हे घडतं असत त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नाही
- नवीन कोण राज्यपाल येणार हे माहीत नाही
- आताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ती चांगली गोष्ट आहे
- राहुल गांधी यांच्या यात्रेला सामान्य नागरिकांचा पाठींबा दिला
- राहुल गांधी यांचं वेगळं चित्र भासवण्याचा प्रयत्न केला होता त्याला हे उत्तर मिळालं
- सीमा भागातील बांधवांच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या कानावर घालेन
- मराठी भागातील नागरिकांच्या पाठीशी सरकारने रहावं
- धार्मिक मुद्द्यावर लोक मतदान करणार नाहीत
- बरं झालं महाराष्ट्राची सुटका होतेय, राज्यपालांच्या पत्रावर शरद पवार यांची खोचक टीका
- मोदींच्या बाबतीत बनवलेल्या माहितीपटावर बंदी ही लोकशाहीवर हल्ला आहे