मनाचा थकवा दूर करायचा असेल तर या स्थळाला नक्की भेट द्या...

मन ताजं-तवानं करायचं असेल... तर, या ठिकाणी नक्की या...

Updated: Dec 8, 2018, 08:59 AM IST
मनाचा थकवा दूर करायचा असेल तर या स्थळाला नक्की भेट द्या...

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : निसर्गाचा सुंदर अविष्कार म्हणजे फुलं... बहरलेली फुलं माणसाच्या मनालाही बहरून टाकत असतात... या शेवंतीच्या फुलांची विविध रंगांच्या छटा पाहून ही दृश्य एखाद्या देश-परदेशातील पर्यटन स्थळालाही फिकं ठरवेल, अशी बाग फुलवण्यात आलीय अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात... विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र आणि प्रांगणविद्या विभागाच्या जागेवर शेवंतीच्या विविध शंभर जातींची लागवड करण्यात आलीय, अशी माहिती पुष्पशास्त्र आणि प्रांगणविद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनिषा देशमुख यांनी दिलीय.  

देशभरातील पुणे, बंगळुरू, नवी दिल्ली, शिमला या ठिकाणांवरून शेवंतीच्या विविध जाती येथे आणण्यात आल्यात. विंटर क्वीन, यलो गोल्ड, हनी कोंब, पिंक, लालपरी अशा शेवंतीच्या विविध जाती येथे पहायला मिळतात. या व्हॅली ऑफ फ्लावर्सची भूरळ अकोलेकरांना न पडली तरच नवल... 

अकोलेकरांनो!, कामाचा थकवा आला असेल.... मन ताजं-तवानं करायचं असेल... तर, या ठिकाणी नक्की या.... फुलांसारखं बहरण्यासाठी...