साईंच्या पायावर तीन दिवसांत पाच कोटी 30 लाखांचं दान

नाताळच्या सुटीनिमित्त साईंच्या दर्शनाला शिर्डीत आलेल्या भाविकांनी त्यांच्या झोळीत तीन दिवसात पाच कोटी 30 लाख रुपयांचं दान टाकलंय. 

Updated: Dec 26, 2017, 09:17 PM IST
साईंच्या पायावर तीन दिवसांत पाच कोटी 30 लाखांचं दान title=

शिर्डी : नाताळच्या सुटीनिमित्त साईंच्या दर्शनाला शिर्डीत आलेल्या भाविकांनी त्यांच्या झोळीत तीन दिवसात पाच कोटी 30 लाख रुपयांचं दान टाकलंय. 

22ते 25 डिसेंबर दरम्यान चार दिवसात तीन लाख भाविकांनी दर्शन घतलं. त्यांनी साईंच्या दक्षिणा पेटीत 3 कोटी 10 लाख रुपयांचं दान टाकलं. तर देणगीच्या काऊंटरवर 1 कोटी 8 लाख आणि डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून 38 लाख रुपयांची देणगी देण्यात आली.