शिवजयंती: विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवर उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं प्रमुख कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.

Updated: Feb 19, 2018, 11:55 AM IST
शिवजयंती: विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवर उपस्थिती title=

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं प्रमुख कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.

राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे तसेच शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय. शिवजयंतीचा उत्साहही शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर दिसतोय. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी शिवाई देवीची पूजा करून कार्यक्रमांना सुरुवात झालीय. यानिमित्तानं शिवरायांच्या जन्मस्थानी शिवभक्तांनीही मध्यरात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती.

मुंख्यमंत्र्यासोबत शिवनेरीवर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही उपस्थित होते.