नागपुरात शिवजयंतीचा उत्साह

देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी होताना दिसत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Updated: Feb 19, 2018, 02:33 PM IST
नागपुरात शिवजयंतीचा उत्साह title=

नागपूर : देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी होताना दिसत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

सकाळपासून शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहतोय. शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संघटनांतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात आले आहे...महाल परिसातल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी सकाळपासून शिवभक्तांची रिघ लागली होती.  ढोल ताशा पथकांनी  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध पारंपारिक कार्यक्रमांनी  सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  "शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत शिवजयंती साजरी होत आहे.