शिवसेनेचं ठरलंय... ईडी कार्यालयावर खासदार देणार धडक

घाबरलेल्या राणे यांनी इडीपासून बचाव होण्यासाठी भाजपात प्रवेश केला.

Updated: Feb 16, 2022, 06:34 PM IST
शिवसेनेचं ठरलंय... ईडी कार्यालयावर खासदार देणार धडक title=

मुंबई : शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिवालय या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपांना सप्रमाण उत्तर दिले. 

किरीट सोनिया यांनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत किंवा त्यांनी ज्या ज्या तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींचे काय झाले. त्या आरोपांवर काय कारवाई करण्यात आली अशी विचारणा शिवसेनेचे सर्व खासदार ईडीच्या संचालकाना भेटून करणार आहेत, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

नारायण राणे यांच्यावरही किरिट सोमैय्या यांनी आरोप केले होते. त्यानंतर घाबरलेल्या राणे यांनी इडीपासून बचाव होण्यासाठी भाजपात प्रवेश केला. ते भाजपाला सरेंडर झाले, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.