वारीस नव्हे लावारीस, भेटल्यावर कानशिलात लगावणार, शिवसेना नेत्याची धमकी

 वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस असल्याचं म्हटलंय.

Updated: Feb 22, 2020, 01:37 PM IST
वारीस नव्हे लावारीस, भेटल्यावर कानशिलात लगावणार, शिवसेना नेत्याची धमकी

जालना : वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस आहे. तो भेटल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलाय.ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.काही दिवसांपूर्वी वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर खोतकर यांनी वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस असल्याचं म्हटलंय.

वारीसची भेट झाल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा दिलाय. राजकीय स्वार्थासाठी हे लोक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा आरोप देखील खोतकरांनी केला.

वादग्रस्त विधान

आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय होईल, असं वक्तव्य केलं आहे. वारीस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.

वीटेचं उत्तर दगडाने उत्तर देऊ, आता तर वाघीणी बाहेर आल्या आहेत, आम्ही सर्व एकत्र आलो तर काय होईल, आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये माजी आमदार वारीस पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.