अहमदनगर : अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या निषेध मोर्चाला सुरूवात झाली आहे. दिल्ली गेटपासून या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. २ शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. यापूर्वीच शिवसेनेने नगर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र अहमदनगर शहरात कडकडीत बंद दिसून येत आहे. अहमदनगर शहरातील बाजारपेठाही कडकडीत बंद आहेत.
अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि अरुण जगताप यांच्यासह अन्य चौघांना अटक करण्यात आलीय. नगरच्या केडगावमध्ये शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या परिससरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने अहमदनगर बंदची हाक दिली आहे.