पुण्यातील 'या' बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची वाढली व्याप्ती, धक्कादायकबाब समोर

 Shivajirao Bhosale Bank scam : शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे.  

Updated: Jan 19, 2022, 09:52 AM IST
पुण्यातील 'या' बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची वाढली व्याप्ती, धक्कादायकबाब समोर  title=

पुणे :  Shivajirao Bhosale Bank scam : शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. बँकेतील आर्थिक व्यवहारातील रक्कम 72 कोटींवरून 436 कोटींवर गेली आहे. सहकार खात्याच्या चाचणी लेखा परीक्षणात धक्कादायकबाब समोर आली आहे. (Shocking information about Shivajirao Bhosale Bank's financial scam)

या प्रकरणी विशेष न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेकडून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लेखापरीक्षणामध्ये संचालक, बँक  अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी याआधीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन अध्यक्ष, सर्व संचालक, कर्जदार, कर्ज अधीक्षक, CEO, शाखा व्यवस्थापकच्या संगनमताने 436 कोटी 55 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप अहवालात ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 82 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अनिल भोसले  संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, चीफ अकाउन्टंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.