TMC kalwa hospital : ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. जून महिन्यात या रुग्णालयात तब्बल 21 नवजात बालकांचा ( NICU) उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील वर्षात ऑगस्ट महिन्यात याच कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती.
कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा रुग्णालयात भेट देत आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोच आता पुन्हा एकदा याच घटनेची ही पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय..जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणचे काम सुरू असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील रुग्णांचा अतिरिक्त ताण य रूग्णल्यावर येत असल्याने सदर मृत्यू होत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासन करत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या याच कळवा रुग्णालयामध्ये 2024 मध्ये जानेवारी महिन्यात 17, फेब्रुवारी मध्ये दहा, मार्चमध्ये 20 तर एप्रिल मध्ये 24 बालकांचा मृत्यू झाला. तर मे महिन्यात 16 आणि मागील जून महिन्यात 21 अशा नवाज्यात बालकांनी त्यांचा जीव गमावला आहे.. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात 512 महिलांची प्रसूती करण्यात आली तसेच मृत्यू पावलेल्या नवाजत बालकांपैकी 6 बालक ही अत्यवस्थ अवस्थेत बाहेरून आलेली होती तर काही अगदी गंभीर परिस्थितीमध्ये होती तर काहींनी त्यांचा जीव 48 तासाच्या आतच गमावल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
ठाणे महानगरपालिकेचे सिविल रुग्णालय तात्पुरत्या कारणास स्थलांतर केले असल्याने रुग्णांचा भार मोठ्या प्रमाणात कळवा रुग्णालयावर येत असल्याचं बोललं जातंयहेच गृहीत धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यबाबत उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते मात्र वर्ष होत आले तरी अधिकच्या रुग्णांकर्ता महापालिका प्रशासनाने उपाय योजना केलीय का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.