पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशनच्या परिसरात विनयभंगाच्या (Molestation) आरोपात अटक असलेल्या आरोपीची यथेच्च धुलाई केल्याच्या धक्कादायक व्हिडिओ (Video) सोमवारी समोर आला आहे. यामध्ये नामांकित कंपनीती सुपरवायझरने त्याच कंपनीतील विवाहित महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील चॅटिंग करत व्हिडीओ कॉल केल्याची तक्रार होती. यामध्ये आरोपीला अटक न केल्याचा आरोप करत पीडित महिलेचा पती आणि भाजपचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला पोहचले. यामध्ये संध्याकाळी आरोपीला अटक करून पोलीस स्टेशन परिसरात आणले. त्यावेळी फिर्यादी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला जोरदार चोप दिला. हाच व्हिडिओ समोर आल्यानं सदर प्रकार समोर आला आहे.
आरोपी एका नामांकित कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. यात महिलेला मागील महिन्यात आरोपीने व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग करून विनयभंग केल्याची तक्रार शुक्रवारी करण्यात आली. यात तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये पोलीस स्टेशनच्या आवारात भाजपचे नरेश मोटघरे आणि पदाधिकारी हे आंदोलन करण्यासाठी बसले. आरोपीला अटक करा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करण्यात आली. यात महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा तक्रारी नंतर गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं.
संध्याकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास आरोपी रघुवेंद्रला पोलीस आवारत पोहचले. पोलीस वाहनातून खाली उतरवताच भाजपचे ठिय्या देऊन बसलेले पदाधिकारी यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून ओढून त्याला लाथा बुक्यांनी मारहाणं केली. त्याचे कपडे फाडले. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीला मारणाऱ्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. यामध्ये आरोपी सह नागपुरे आणि अजय वाघमारे नामक दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.
यावर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही तपासून पोलीस स्टेशनच्या आवारात झालेल्या राड्याचा प्रकरणात भाजपचे पदाधिकारी असलेले निलेश मोटघरे, महिलेचा पती, यांच्यासहा 13 जणांवर शासकीय कामात अडथळा, अटेकतील आरोपीला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, पोलिस स्टेशनच्या आवरत गैरकायदेशीर मंडळी गोळा करून ठिया देऊन बसने या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. 7 जानेवारीला पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा गुन्हा दाखल केला. यामध्ये मात्र अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही.
चक्क पोलीस स्टेशनच्या आवरता राडा करून अटक नाही...
यात 7 जानेवारीला गुन्हा दाखल केला असतांना दोन दिवस लोटले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारत आरोपीला मारहाण करण्याची गंभीर घटनेत गुन्हा दाखल होऊन मात्र कोणालाच अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अटक करण्यास विलंब का केला जात आहे असाही प्रश्न या निमित्यान उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे.