मालेगावात 'झी २४ तास'चा जोरदार दणका, दुकाने पोलिसांनी पाडली बंद

मालेगावात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी काही भाग सील करण्यात आले आहे. 

Updated: Apr 25, 2020, 02:41 PM IST
मालेगावात 'झी २४ तास'चा जोरदार दणका,  दुकाने पोलिसांनी पाडली बंद title=

नाशिक : मालेगावात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी काही भाग सील करण्यात आले आहे. कोरोना धोका असल्याने खबदारी घेण्यात येत होती. मात्र, आज दुकाने उघडण्यात आल्यानंतर मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीला हरताळ फासला गेला. या ठिकाणी नियमाचे उल्लंघन दिसून आले. याबाबत  'झी २४ तास'ने आवाज उठवला. त्यानंतर मालेगावात  'झी २४ तास'चा जोरदार दणका दिसून आला. रमझानपुरा भागातली दुकानं पोलिसांनी पाडली बंद पाडली. ही दुकाने सकाळपासून उघडली होती.

रमझानच्या रमजानच्या पार्श्वभूमीवर मालेगावमधील बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. सकाळी रमझानपुरा भागात चप्पल, गॉगल अशा वस्तूंची दुकाने अचानक खुली झाली. रमझानसाठी खरेदी करण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली. केंद्र सरकारने आदेश काढताच राज्य सरकारच्या आदेशांची वाट न पाहता मालेगावात दुकानं सुरू करण्यात आली. मात्र 'झी २४ तास'ची बातमी प्रसारीत झाल्यावर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि पोलिसांनी रमझानपुरा भागात धाव घेत तातडीने सर्व दुकानं बंद करायला लावली.  'झी २४ तास'च्या बातमीमुळे अवघ्या तासाभरात मालेगावातही गर्दी हटवण्यात आली. 

 रमजानच्या पार्श्वभूमीवर मालेगावमधील बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत होती. त्यामुळे रमजानपुरा भागात लॉकडाऊनचा फज्जा उडालेला दिसून आला. केंद्र सरकारने परवानगी देताच दुकाने उघडल्याने नागरिक रस्त्यावर आले होते. दरम्यान, या ठिकाणी फिजिकल डिस्टनसिंगची एशितैशी दिसून आली. या गर्दीवर नियंत्रण आणणे कठिण झाले होते. पोलीस यंत्रणा मात्र हतबल अशीच अवस्था दिसून येत होती. याबाबत 'झी २४ तास'ने वृत्त प्रसारीत केल्यानंतर पोलीस यंत्रणा कमालीची हलली आणि उघडण्यात आलेली दुकाने बंद करण्यात आली.