सागर आव्हा, झी मीडिया, धनकवडी: सध्या दिवाळी, नवरात्रमुळे सगळीकडे देवभक्तीचा जागर सुरू झाला आहे. सगळीकडे नास्मरणाचा, भक्तीचा जागर पाहायाला मिळतो आहे. देवळं सध्या भक्तांनी भरभरली आहेत. अशावेळी सातारा येथील धनकवडी येथील श्री शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन (Shree Shankar Maharaj Prakat Din Sohala) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भक्तांच्या मोठ्या रांग्या लागलेल्या पाहायला मिळाल्या. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतून तुम्हालाही प्रसन्न झाल्यासारखं वाटेल. व्हिडीओतून दिसते की भक्तजन लांबून लांबून केवळ दर्शनासाठी आली आहेत. शंकर महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्तानं सगळं वातावरण तेव्हा भक्तीमय झालेलं पाहायला मिळालं. (shri Sadguru Santvarya Yogiraj Shankar Maharaj Samadhi ceremony news in marathi)
सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री.शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या असून प्रकट दिनानिमित्त श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कीर्तन महोत्सव (Kirtan Mohotasav) तसेच श्री.शंकर महाराजांची चरित्र भावकथा व रक्तदान शिबिर आदी उपक्रम घेण्यात आले.
आज होणारी गर्दी पाहता समाधी मठाच्या वतीने संपूर्ण परिसरात नियोजन व भक्तांना दर्शन रांगेत लवकर दर्शन कसे होईल या संदर्भात काळजी घेण्यात आली आहे. तसेच भाविक भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर (Suredra Vaikar) व सचिव सतीश कोकाटे यांनी दिली. पुणे शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी प्रकट दिनाचे औचित्य साधून पहाट पासूनच दर्शनाला उपस्थिती लावली होती.
सध्या हा व्हिडीओ सगळीकडे पाहिला जातो आहे. सध्या हा व्हिडीओ (Video) पाहून सगळ्यांनाच देवदर्शनचे वेध लागले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून देवदर्शनला जाण्यासारखे वाटल्याशिवाय राहणार नाही.