सिंधुदुर्ग : मगर आणि त्याच्याशी दोस्ती कस काय शक्य असाच प्रश्न मनात येऊन गेला ना ?
आणि तस वाटण ही स्वाभविक आहे कारण मगरीशी दोस्ती कस बर कोण करेल ? पण याला अपवाद सिंधदुर्ग जिल्ह्यातील एक तरूण ठरलाय आहे. होय तो मगरीशी दोस्ती करतोय कोण आहे तो तरूण? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली गावातून वाहणारी ही तेरेखोल नदी... या नदीच्या भागात गेली काही वर्षे एकाच ठिकाणी सुमारे 40 ते 50 मगरी वास्तव्य करतात. याच नदीतिरावर राहणारे हे रामचंद्र चराठकर. चराटकर यांच्या घराशेजारच्या असलेल्या या नदीपत्रात मगरीची मात्र त्यांना भिती नसून उलट त्यांची आणि मगरीची चक्क मैत्री आहे.
चराठकर यांच खास वैशिष्ठ म्हणजे चराठकरांच्या एका शिट्टी च्या हाकेला या मगरी धावत येतात. त्या पाण्यात असो वा पाण्याच्या काठावर कुठेही असल्या तरी, त्यांच्याच एका शिट्टी ची ओळख या मगरी नापुरेशी असते..इन्सुली मध्ये गेली गेली 5 ते 6 वर्षे मगरींचे वास्तव्य आहे. मात्र आता या मगरी इथल्या लोकांना त्रास दायक न ठरता, त्या पर्यटनासाठी महत्वाच्या ठरू लागल्या आहेत.
मगरी च्या वाढत्या संख्येमुळे मगरी ना पाहण्यासाठी स्थानिकच नव्हे तर गोवा, सांगली, कोल्हापूर, सातारा, मुंबई पुणे कोल्हापूर एवढंच नव्हे तर परदेशी पाहुणे ही आपली हजेरी लावतात . सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो ,साहाजीकच या मगरी ना पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढतेय. पर्यटनासाठी हे स्थळ म्हत्वाच ठरू पहातय, त्यामुळे येथे एक क्रोकडडॉल पार्क व्हावे अस मत व्यक्त होतय