सहा शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयसमोर विष घेतलं

 ही धक्कादायक बातमी परभणी जिल्ह्यातील आहे.

Updated: Apr 19, 2018, 01:30 PM IST

गजानन देशमुख, परभणी : ही धक्कादायक बातमी परभणी जिल्ह्यातील आहे. मानवत तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा योजनेच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. परभणी जिल्ह्यातल्या मानोली इथल्या चार ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी मानवत तहसिल कार्यालयात विष प्राशन केलं. मुख्यमंत्री आज परभणी दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.