नागपूरच्या आमदार निवासात साप

  नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Updated: Dec 20, 2017, 09:37 PM IST
 नागपूरच्या आमदार निवासात साप  title=

नागपूर :  नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. 

नागपूरच्या आमदार निवासात साप निघाल्याने एकच खळबळ उडाली.  खोली क्रमांक ५० मधून साप निघाल्याची बातमी समोर येत आहे. 

आमदार निवासातील खोली क्रमांक ५० ही समाजवादी पक्षाचे मुंबईतील आमदार अबू असिम आझमी यांच्या नावावर आहे. 

अधिवेशन काळातच आमदार भवन मध्ये आमदारांच्या  जीवाशी येणारी दुसरी वेळ आहे. 

दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत साप पकडला गेलेला नव्हता.