सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माढा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार दीपक साळुंखेचा आवाज असल्याचा दावा करणारं एक ध्वनीमुद्रण सध्या समाज माध्यमामध्ये पसरलंय. या ध्वनीमुद्रणात राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षांना शिवीगाळ करण्यात आलीय. शिवाय शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावाही करण्यात आलाय.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडालीय.
मात्र आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप सांळुखे यांनी केलाय.
दुसरीकडे अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुरेखा ताई पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबतची तक्रार केलीय.