महाराष्ट्रात हायवे बांधकामात नवा विक्रम, नितीन गडकरींकडून कौतूक

 सोलापुरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक नवा विक्रम केला आहे. 

Updated: Feb 26, 2021, 06:51 PM IST
महाराष्ट्रात हायवे बांधकामात नवा विक्रम, नितीन गडकरींकडून कौतूक

सोलापूर : सोलापुरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक नवा विक्रम केला आहे. या विक्रमाचं कौतुक खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. दररोज देशभरात 40 किलोमीटर महामार्ग बनविण्याचं नितीन गडकरी यांचं लक्ष्य असलं तरी सोलापूरात एकाच ठिकाणी तब्बल 25.54  किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग 18 तासात पूर्ण केला आहे. 

मागील आठवड्यात नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गाच्या कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मक्तेदारांना कामाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.

सोलापूर विजापूर या 110 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गातील 25.54 किलोमीटर रस्त्याचे काम अवघ्या 18 तासात पूर्ण करण्यात आलं आहे.