एका खास मशिनद्वारे सट्टेबाजी करायचा बुकी सोनू

ठाणे पोलिसांनी समोर आणली मशीन

Updated: Jun 2, 2018, 05:33 PM IST
एका खास मशिनद्वारे सट्टेबाजी करायचा बुकी सोनू

ठाणे : सट्टेबाज सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान हा एका विशिष्ट मशिनद्वारे आपल्या पंटर्सशी बातचीत करत होता. लाईन होल्डिंग मशीन असं या मशिनचं नाव आहे. या मशिनच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात मोबाईल नंबर लिहिलेले आढळले तर दुसऱ्या बाजूला वॉल्यूम कंट्रोलर होता. या मशिनला एक माईकही जोडला गेलेला होता. त्याद्वारे तो बोलत असे.

पाहा कशी आहे ही मशीन...

सट्टेबाजीप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं अरबाजला समन्स बजावला होता. तीन दिवसांपूर्वी सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान याला ठाणे गुन्हे शाखेनं आयपीएलवर सट्टा लावल्याप्रकरणी अटक केली होती. सोनूच्या चौकशीत सट्टेबाज आणि बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. अरबाजसोबतच याप्रकरणी निर्माता पराग संघवी याचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अजून तीन चित्रपट निर्माते पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे.