पर्यावरणपूरक लग्नाची पत्रिका

लग्नाची पत्रिका केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी जमिनीत पुरली तर... आणि मग त्यातून तुळस किंवा निलगिरीचं झाड उगवलं तर... तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे... पण थांबा आधी औरंगाबादच्या नागेश आणि अनघाच्या लग्नाची पत्रिका पहा... म्हणजे तुमचं मत नक्कीच बदलेल...

Updated: Jun 8, 2017, 10:54 AM IST
पर्यावरणपूरक लग्नाची पत्रिका

औरंगाबाद : लग्नाची पत्रिका केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी जमिनीत पुरली तर... आणि मग त्यातून तुळस किंवा निलगिरीचं झाड उगवलं तर... तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे... पण थांबा आधी औरंगाबादच्या नागेश आणि अनघाच्या लग्नाची पत्रिका पहा... म्हणजे तुमचं मत नक्कीच बदलेल...

औरंगाबादचे रहिवासी नागेश आणि अनघा येत्या 18 तारखेला विवाहबद्ध होतायत. आपलं लग्नही चिरंतन आठवणीत रहावं आणि त्यातून निसर्गासाठी काहीतरी करावं अशी दोघांची इच्छा. त्यासाठी मग त्यांनी राजस्थानमधून पत्रिका मागवल्या. या पत्रिका खास आहेत. लग्नानंतर ही पत्रिका जमिनीत पुरायची मग त्यातून झाड उगवणार... आहे ना ही पत्रिका खास... ही पत्रिका तुळस आणि निलगिरीच्या बियाणांपासून बनवण्यात आलीय. 

खर्चिक पत्रिका सारेच छापतात पण लग्नानंतर आपण या पत्रिकांना केराची टोपलीच दाखवतो. नागेश यांच्या लग्नाची पत्रिकाही खर्चिक आहे पण तीला कुणी केराची टोपली दाखवणार नाही हे निश्चित...

फक्त संदेश देण्यापेक्षा आपणच कृती केली तर किती उत्तम हाच नागेश आणि अनघाचा उद्देश..

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x