SSC JE Bharti 2024: स्टाफ सिलेक्शनच्या भरतीची तयारी करणाऱ्या देशातील लाखो उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) वेळोवेळी रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात येते. सध्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 968 पदांची मोठी भरती होत आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ज्युनिअर इंजिनीअरची 968 पदे भरण्यात येणार आहेत. या अंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पदे भरली जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इंजिनीअरिंग डिग्री किंवा संबंधित ब्रांच मधून डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण उमेदवारांकडून 100 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणारआहेत. तर महिला/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्व्हिसमन यांच्याकडून कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
28 मार्चपासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 18 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अपूर्ण माहिती भरल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज बाद करण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा. येथे 'नवीन नोंदणी' वर क्लिक करा. येथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल. ईमेलवर आलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड पाहा आणि लॉगिन करा. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, अप्लाय नाऊ वर क्लिक करा. आता तुमची वैयक्तिक माहिती मागितली जाईल. येथे तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, एज्युकेशन हिस्टरी अशी सर्व माहिती भरा.