बॉसकडे पगारवाढ मागायला जाताय? थांबा! आधी 'या' गोष्टी समजून घ्या

बॉसकडे पगारवाढ मागण्यासाठी आधी कशी तयारी करायची? पगारवाढ नाही मिळाली तर काय करायचं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

| Feb 03, 2024, 18:20 PM IST

Salary Negotiation Tips: बॉसकडे पगारवाढ मागण्यासाठी आधी कशी तयारी करायची? पगारवाढ नाही मिळाली तर काय करायचं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1/12

बॉसकडे पगारवाढ मागायला जाताय? थांबा! आधी 'या' गोष्टी समजून घ्या

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

Salary Negotiation Tips: दरवर्षी भरघोस पगारवाढ व्हावी असे नोकरदार वर्गाला दरवर्षी वाटतं. यासाठी आपण मन लावून कामदेखील करतो. पण पगारवाढ हवीय, हे बॉसला कसं सांगाव, हे अनेकांना कळत नाही. बॉसकडे पगारवाढ मागण्यासाठी आधी कशी तयारी करायची? पगारवाढ नाही मिळाली तर काय करायचं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2/12

स्वत:ला विचारा हे प्रश्न

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

बॉसकडे पगारवाढीसाठी जाण्याआधी मी कामाप्रती प्रामाणिक आहे का?, मी माझे शंभर टक्के कंपनीला देतोय का?, मी नवे स्किल शिकण्यासाठी जिज्ञासू आहे का?, मी पुढे येऊन जबाबदारी घेतो का?, माझ्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो का? 

3/12

योग्य वेळ कोणती?

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

कंपनीत काम करुन तुम्हाला 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर, सॅलरी हाइकची वेळ जवळ आली असेल तर, कंपनीचा मार्केट परफॉर्मन्स चांगला असेल तर, नियमित कामांपेक्षा तुमच्याकडे वेगळी जबाबदारी दिली जात असेल तर, दिलेल्या कामापेक्षा तुमच्याकडे वेगळे स्किल असेल तर किंवा तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीची ऑफर असेल तर

4/12

तुमच्या कौशल्याचे बाजारमूल्य

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

तुम्ही जे काम सध्या करताय त्याबद्ल बाजाराचा कल समजून घ्या. इतर कंपन्यांची पगार रचना जाणून घ्या. तुमचे कौशल्य कामाप्रमाणे आहेत का याचा विचार करा.स्वत:चे मूल्यांकन करा.

5/12

टिमवर्क

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

स्वत:चे काम चांगले असेल तरी टीम म्हणून तुम्ही कसे करता याचे मुल्यांकन करा. टीमच्या सदस्यांशी तुमची वर्तणूक कशी असते. गरजेच्यावेळी तुम्ही टीमला सहकार्य करता का? हेदेखील महत्वाचे ठरते. 

6/12

उलट प्रश्न

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

पगारवाढ मागायला गेल्यावर बॉस, एचआर तुम्हाला हमखास प्रतिप्रश्न करतील. यासाठी तुमच्याकडे काय उत्तरे असतील? याची तयारी आधीच करा. यासाठी तुमच्याकडे तर्क आणि उदाहरणे असायला हवीत. 

7/12

आत्मविश्वास

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

पगाराच्या वाटाघाटीमध्ये आत्मविश्वास हा आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतो. तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तरच टीम, कंपनी आणि तुमच्या बॉसलाही तुमच्यावर विश्वास असेल. पण आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यातील सूक्ष्म फरक लक्षात घ्या. आपल्या क्षमतेवर विश्वास नसणे, स्वतःला कमी लेखणे हेदेखील चुकीचे आहे, हे ध्यानात असूद्या.

8/12

आदल्या दिवशीची तयारी

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

ज्या दिवशीपगारवाढीची चर्चा करायची असेल त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण झोप घ्या. सकाळचा नाश्ता हलका आणि प्रथिनेयुक्त फायबरयुक्त ठेवा. खरतंर या गोष्टी रोज व्हायला हव्यात. पण विशेषत: त्या दिवशी मन आणि शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा जाणवेल याची काळजी घ्या. 

9/12

स्पष्टपणे बोला

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

मन शांत ठेवा.संभाषणात तणावग्रस्त होऊ नका. विचारलेल्या सर्व प्रश्नांची संयमाने आणि गांभीर्याने उत्तरे द्या. तुम्ही बोलत असताना त्या दिवशी बॉसचा मूड चांगला आहे का? हेदेखील तपासा. तुम्हाला किती पगारवाढ हवी आहे ते स्पष्टपणे सांगा.

10/12

नंतर अंदाल जावू नका

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

तुम्हाला किती पगारवाढ हवी आहे, असे विचारल्यावर नंतर अंदाज लावू नका. तुम्हाला 5% किंवा 10% वाढ हवी आहे  किंवा तुम्हाला इन हॅण्ड 10 हजार रुपये हवे आहेत, हे आधीच मनात ठरवा. 

11/12

वाटाघाटीसाठी तयार रहा

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

सर्व मनासारखे झाले तरी वाटाघाटीची परिस्थिती निर्माण होईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडे अधिक मागणे, हे कधीही चांगले. तरच तुम्हाला  तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता असते. 

12/12

पगारवाढ नाही मिळाली तर

Salary Negotiation Tips For Employers Office Tips

तुम्हाला देण्यात आलेली पगारवाढ विनम्रतेने मान्य करा किंवा शांतपणे तुमचे मत मांडा. सध्याच्या कंपनीतील आपले संबंध खराब करु नका. स्वत:चे कठोर आकलन करा. स्किल्स वाढवा.  कामाची दुसरी संधी शोधा.