दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार!

दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे. 

Updated: Jun 12, 2017, 05:16 PM IST
दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार! title=

पुणे : दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे.  दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होईल. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.

गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. सोशल नेटवर्किंगवर निकालाच्या खोट्या तारखा पसरवण्यात येत होत्या. निकालाबाबत वाढत चाललेल्या या अफवा पाहून अखेर बोर्डानं प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं. 

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.rediff.com/exams