कर्मचारी संपावर ठाम, एसटी विलिनीकरणावर तोडगा कसा निघणार?

ST Strike News : एसटीचे विलिनीकरणच हवे, पगारवाढ नको, असे म्हणत कर्मचारी संपावर ठाम आहेत.  

Updated: Nov 25, 2021, 10:21 AM IST
कर्मचारी संपावर ठाम, एसटी विलिनीकरणावर तोडगा कसा निघणार? title=
संग्रहित छाया

मुंबई : ST Strike News : एसटीचे विलिनीकरणच हवे, पगारवाढ नको, असे म्हणत कर्मचारी संपावर ठाम आहेत. (ST Employees Firm on strike) कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. त्यामुळे कर्मचारीव संपावर तोडगा निघण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. दरम्यान, आज आझाद मैदानात संपकरी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी सुरुच आहे. (ST Employees Firm on strike, how to resolve settlement on ST merger?)

सरकार चार पावले मागे आले आहे. मात्र, एसटी कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे संपावर तोडगा कसा काढायचा असा पेच दिसून येत आहे. तर गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांना समजावण्याच्या भूमिकेत दिसत असले तरी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

सरकारने दिलेली वेतववाढ आझाद मैदानात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावली आहे. वेतनवाढीवर आपण समाधानी नसलो तरी सरकार चार पावलं मागे आलं आहे. तुमच्या भावनेसोबत आम्ही आहोत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पडळकर आणि खोत सध्या आझाद मैदानातून बाहेर पडलेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x