रत्नागिरी : fighting between two groups : जिल्ह्यात शिमगोत्सवाची (Shimgotsav in Ratnagiri) पालखी नेण्यावरून दोन गटांमध्ये तुफानी हाणामारी झाली. राजापूर तालुक्यातील डोंगरगाव इथे शेलार आणि गुरव असे दोन मानकरी आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखी पहिल्यांदा कुणाकडे न्यावी, यावरून दोन्ही गटांमध्ये राडा झाला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गावात जमावबंदी लागू केली. त्यामुळे पुढचा अनार्थ टळला. याप्रकरणी दोन्ही बाजूच्या 41 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. 'जत्रा' या चित्रपटातील ह्याला गाड आणि त्याला गाड या दोन गावांमध्ये मानकऱ्यांचा असाच वाद दाखवला आहे. त्याचाच प्रत्यय रत्नागिरीत आला.
कोकणात शिमगोत्सव मानपान ही बाब काही नवीन नाही. याच मानपानाच्या गोष्टीवरून थेट देवाच्या गाभाऱ्यातच राडा झाला. दोन गट एकमेकांना भिडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगर गावात झालेल्या राड्यानंतर गावात 144 कलम लागू करण्यात आला आहे. तसेच परस्पर विरोधी झालेल्या तक्रारीनंतर दोन्ही बाजुच्या 41 जणांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगर गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखी कुणाकडे पहिल्यांदा नेण्यात यावी यावरून राडा झाला आणि दोन्ही बाजुच्या महिला आणि पुरूष एकमेकांना भिडले. दरम्यान, यावेळी पोलीस उपस्थित असल्याने त्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे संभाव्य मोठा वाद सुदैवाने टळला.