परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर

बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 12:27 PM IST
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर

जालना : बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

 भोकरदन-जालना रस्त्यावरील कुंभारी फाट्यावरची घटना ही घटना घडली. या अपघातात १ जण जागीच ठार तर २ विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.

 तिन्हीही विद्यार्थी तडेगाववाडी गावचे रहिवासी आहेत. भोकरदनच्या रामेश्वर कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेला जात होते.