Satara Accident News : गर्दीमुळे एका विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील वाई एसटी बस स्थानकात ही विचित्र घटना घडली आहे. गर्दीत धक्का लागून मुलगी खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ST बस गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे सातारा बस स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी संतप्त झाले. बस स्थानकात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
साताऱ्यातील वाई एसटी बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावणी अहिवळे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. श्रावणी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. मृत श्रावणी ही वाई तालूक्यातील सुलतानपुर येथे राहत होती. शाळा सुटल्यावर घरी निघाली असताना वाई एसटी स्टँडवर गर्दीमुळे तिला धक्का लागला आणि खाली पडली. यावेळी एका एसटी बसच्या चाकाखाली ती चिरडली गेली. या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी नेमला जावा अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
सातारा - फलटण मार्गावर मद्यधुंद अवस्थेत एका पोलीस निरीक्षकाने गाडीने युवकांना धडक दिलीये. दोघेही किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने पोलीस निरीक्षकाला चोप दिला. दादासाहेब पवार असं संबंधित पोलीस अधिका-यांचं नाव आहे.
साताऱ्यातील खटाव तालुक्यात सूर्याचीवाडी इथे ओमनी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी-मायणी रस्त्यावरील सूर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडावर आदळली. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुणे - सातारा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वरवे गावाच्या हद्दीत चार गाड्या एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झाला होता. वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. खासगी बस पटली झाल्यानं चौघांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले होते.