औरंगाबादमधील वस्तीगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा खून

गळा दाबून खून केल्याचा प्रकार

Updated: Dec 12, 2018, 08:45 PM IST
औरंगाबादमधील वस्तीगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा खून title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या एमजीएम कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय डॉक्टर विद्यार्थिनीचा तिच्या रूममध्ये घुसून गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. डॉ. आकांक्षा अनिल देशमुख असे खून झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षा एमजीएमच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती. आकांक्षा ही एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ३३४ मध्ये दोन विद्यार्थिनीसोबत राहत होती. 

तिच्या रूमपार्टनर तंत्रनिकेतन आणि इंजिनिअरींच्या विद्यार्थिनी असून त्यांची परीक्षा नुकतीच झाल्याने त्या गावी गेल्या होत्या. यामुळे तीन दिवसांपासून आकांक्षा वसतिगृहात एकटीच होती. डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आकांक्षाचा गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे.