मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाचा बारमध्ये जोरदार राडा

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये एका मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकानं जोरदार राडा केला

Updated: Apr 27, 2018, 05:48 PM IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये एका मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकानं जोरदार राडा केला. दारुच्या नशेत तर्राट झालेल्या पोलीस उपनिरीक्षकानं इथल्या मधूबन बिअर बारमध्ये मारझोड केली. इतकंच नाही तर बीअर मालक आणि ग्राहकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. अमोल मालुसरे असं या पीएसआयचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

साडे चार हजाराचं बिल मागितल्यानं साहेबांचा पारा चढला आणि त्यानं थेट रिव्हॉल्व्हर काढून धमकावण्यास सुरुवात केली. हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलीस तिथं आलं. 

त्यावेळी या मालुसरेनं पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर यांच्याही दोन श्रीमुखात भडकावल्या. अखेर कसंबसं त्याला पोलिसांनी अटक केली.