वीर जवान तुझे सलाम, आंबेगाव तालुक्यावर शोककळा, सुधीर थोरात यांना वीरमरण!

भारतमातेच्या या साहसी सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली!

Updated: Nov 15, 2022, 07:48 PM IST
वीर जवान तुझे सलाम, आंबेगाव तालुक्यावर शोककळा, सुधीर थोरात यांना वीरमरण!  title=

Pune : पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील लौकी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद सुधीर पंढरीनाथ थोरात शहीद झाले आहेत. कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलं आहे परंतु त्यांच्या अकाली जाण्याने मोठी शोककळा पसरली आहे. 13 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. (sudhir thorat pune ambegaon taluka has been martyred marathi news)

सुधीर थोरात भारतीय सैन्यात भरती झाले तेव्हा त्यांचा फिटनेस, कौशल्य ओळखून BSFने त्यांना विविध स्पर्धांमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्षे त्यांनी ती लिलया पेलली. एवढंच नव्हे तर आपल्या विभागाला पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाची अनेक पदकं देखील जिंकून दिली. 

देशांतर्गंत स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पदक जिंकलं नाही असं क्वचितच झालं. यावेळीही ग्वाल्हेर येथील स्पर्धेसाठी ते गेले होते. 14 तारखेपासून या स्पर्धा सुरु झाल्या, मात्र आदल्या दिवशी अघटीत घडलं. प्रॅक्टिस दरम्यान घोड्याची धडक बसल्याने त्यांना वीरमरण आलं. 

अचानक जाण्याने सुधीर थोरातांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फौजी सुधीर यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.