धक्कादायक ! आत्महतेचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोरोनाच्या भीतीने रुग्णालयात नेले नाही, अखेर मृत्यू

कोरोनाची दहशत एवढी झालीय की त्यामध्ये माणुसकीच हरवत चाललीय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Updated: Mar 18, 2020, 02:10 PM IST
धक्कादायक ! आत्महतेचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोरोनाच्या भीतीने रुग्णालयात नेले नाही, अखेर मृत्यू title=
संग्रहित छाया

नागपूर : कोरोनाची दहशत एवढी झालीय की त्यामध्ये माणुसकीच हरवत चाललीय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरात एका धक्कादायक घटना घडली. शहरातल्या जुनी मंगळवारी परिसरात राहणाऱ्या प्रमोद बुट्टे यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्यायल्यानंतर प्रमोद तडफडत होता. त्यांची ही अवस्था पाहून पत्नीने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. पण रुग्णालयात घेऊन गेलो, तर कोरोना होईल या भीतीने शेजारी प्रमोद याला रुग्णालयात घेऊन जायला तयार नव्हते. शेवटी प्रमोद यांच्या पत्नीने नातेवाईकांना फोन केला. ते येईपर्यंत दोन ते अडीच तास गेले आणि उशिर झाला.

प्रमोद बुट्टे यांना रुग्णालयात दाखल न केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाची गंभीर दखल  पोलिसांनी घेतली आहे. नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून रुग्णांना लोकांनी त्वरीत मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लकडगंज पोलीस स्टेशनच्या पोलील उपनिरीक्षक राखी गेडाम यांनी लोकांना अडचणीच्यावेळी मदतीचे आवाहन केले आहे. कोरोनाला घाबरु नका, जीव वाचवायला हवा. कोरोनाशी लढणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, असे राखी गेडाम म्हणाल्यात.

0

दरम्यान, कोरोनाची बाधा झालेली एक महिला गेले आठवडाभर औरंगाबाद शहरात फिरत होती. कॉलेजमध्ये तीने क्लासेसही घेतले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. अनेक लोक एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याचे चित्र आहे. यावरच मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.