रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरमध्ये दहावीच्या मुलीची आत्महत्या

पंढरपूर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Jan 24, 2019, 01:58 PM IST
रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरमध्ये दहावीच्या मुलीची आत्महत्या title=

पंढरपूर - पंढरपूरमधील वाखरी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून तिने ही आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल पोरे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला काही मुलांकडून त्रास देण्यात येत होता. तिला वेगवेगळ्या चिठ्ठ्या पाठविण्यात येत होत्या. याबद्दल तिने नातेवाईकांनाही माहिती दिली होती. पण काही जणांनी काजलचीच चूक असल्याचे सांगत तिला शांत राहण्यास सांगितले. यासर्व प्रकारामुळे काजल गेल्या काही दिवसांपासून नाराज होती. अखेर बुधवारी तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजलला त्रास देणारे विद्यार्थी कोण आहेत, याचा शोध घेण्यात येतो आहे. त्याचबरोबर या प्रकरणी शाळेतील शिक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे. 

Tags: