सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख, राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Updated: Jan 24, 2019, 08:33 AM IST
सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख, राहुल गांधी यांची घोषणा  title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या विविध समन्वय समितीं सदर्भात कॉंग्रेसची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. केंद्रात असलेल्या भाजप सरकारला शह देण्याच्या आणि पुन्हा सत्तेत येण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी लोकसभेला भाजपचा विजयी मेरु रोखण्याचे आव्हान असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने लढण्यातच फायदा असल्याचे आता नेत्यांना समजले आहे. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा तो पंतप्रधान पदाच्या जवळ जाणार हे जाहीर सूत्र आहे. त्यात सध्या भाजपतर्फे शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसात केला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची युती केव्हाही होऊ शकते याबद्दल कॉंग्रेस नेत्यांच्या मनात शंका नसेल. या सर्वांची पुर्वतयारी सध्या कॉंग्रेसकडून केली जात आहे. 

Image result for rahul gandhi zee

प्रभारी असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर समन्वय समितीची धुरा सोपवण्यात आली आहे. समित्यांच्या सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसचे प्रचारप्रमुखपद देण्यात आले आहे. तर जाहीरनामा समितीचे प्रमुखपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. खासदार कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे. 

आघाडीचे भवितव्य 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची इनिंग आहे. त्यामुळे एक एक जागा पवार यांच्यासाठी महत्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली इनिंग सुरू झाली असल्यामुळे त्यांच्यासाठीही लोकसभेची एक एक जागा महत्वाची असणार आहे. यात दोन पावले मागे कोण जाणार, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार असून या सर्वांवरच आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.