दोन चिमुकल्यांसह आईची गोदावरी नदीत आत्महत्या

कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Updated: Jun 24, 2018, 02:45 PM IST
दोन चिमुकल्यांसह आईची गोदावरी नदीत आत्महत्या title=

नांदेड: दोन चिमुकल्या मुलींसह गोदावरी नादिपात्रात उडी घेतलेल्या माय लेकीचा मृतदेह सापडलेत. दोन लहानग्या मुलींसह आईने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी इथली ही घटना आहे. पूजा कांबळे या ३५ वर्षीय महिलेने आपल्या ३ वर्षीय सुविद्या आणि ५ वर्षीय शिवाणी सह गोदावरी नादिपात्रात उडी घेतली होती. 

मच्छिमारांच्या मदतीने मृतदेहांचा शोध

दरम्यान, या धक्कादायक प्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनाला कळताच पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले. माच्छीमारांच्या मदतीने सुरू केलेल्या शोधकार्याला यश आले. पूजा कांबळेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेहरी बाहेर काढण्यात आले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

प्राप्त माहितीनुसार, पूजा कांबळे ही महिला ६ महिन्यापासून माहेरी होती. कुंडलवाडी येथे सासरी आल्यानंतर तीने हे टोकाचे पाऊल ऊचलले. कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.