युवती गायब प्रकरणात निलंबित डीआयजी निशिकांत मोरेंचा हात नाही?

 निलंबित डीआयजी निशिकांत मोरे युवती विनयभंग प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. 

Updated: Jan 16, 2020, 12:49 AM IST
युवती गायब प्रकरणात निलंबित डीआयजी निशिकांत मोरेंचा हात नाही? title=

पनवेल : निलंबित डीआयजी निशिकांत मोरे युवती विनयभंग प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. सुसाईड नोट लिहून पीडित अल्पवयीन मुलगी ७ जानेवारीला घरातून निघून गेली होती. ती आपल्या मित्रासोबत डेहराडूनला गेल्याचं निष्पन्न झालं आहे. त्या मित्रावर अपहरण आणि पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

हा मुलगा २० वर्षांचा असून वडिलांच्या दुकानात काम करत होता. तिच्या मिसिंग प्रकरणात निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांचा हात नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

दरम्यान, निशिकांत मोरे हे अजून फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणात निशिकांत मोरेंसह एका पोलिसांला निलंबित करण्यात आलं आहे.