एटीएसच्या ताब्यातले दोघेही एकाच घरात राहत असल्याचा संशय

 सनातनच्या दोन कार्यकर्त्यांना हे घर जुलै महिन्यात भाड्याने देण्यात आलं होतं. 

Updated: Aug 11, 2018, 04:02 PM IST
एटीएसच्या ताब्यातले दोघेही एकाच घरात राहत असल्याचा संशय title=

नालासोपारा : नालासोपाऱ्यातील वैभव राऊत प्रकरणात एटीएसने आणखी एका घरावर छापा मारल्याची माहिती समोर आलीय. नालासोपाऱ्यातील एलोरा इमारतीतील बी-203 या घरावर छापा मारला होता. या घरातून काही कागदपत्रं आणि संगणकही जप्त केल्याचं सांगण्यात येतंय. हे घर विजय जोशीच्या नावावर आहे. विजय जोशी आणि वैभव राऊत हे चांगले मित्र आहेत. वैभवने आपल्या दोन मित्रांना काही दिवसांसाठी घरात ठेवण्याची विनंती केली होती. यावर जोशीने सनातनच्या दोन कार्यकर्त्यांना हे घर जुलै महिन्यात भाड्याने देण्यात आलं होतं.

तपास सुरू 

 तर या प्रकरणातील दुसरा आरोपी शरद पळसकर याला याच घरातून उचलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. एटीएसने शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर या दोन आरोपींना अटक केली होते. हे दोघे इथेच राहत होते का हे आता पाहावे लागेल. मात्र या सोसायटीच्या सचिवाने दोन जण त्यांच्या घरात पाणी जास्त साचल्याने इथं काही दिवस निवाऱ्याची व्यवस्था केल्याचं जोशीनं सांगितल्याचं बोललं जातंय.