परभणीः परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दिग्रस येथ एक धक्कादायक घटना घडली आहे. वाळू धक्यावर अवैध वाळू उपसा (illegal sand mining) करण्याऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी पाण्यात बुडाला असल्याचा प्रकार समोर आला आहे.. सुभाष होळ असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. तसंच, दोषींचा शोध सुरू आहे. (Parbhani)
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. अनेक भागात वाळू माफियांची दादागिरी ही चालते. जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथील पूर्णा नदीच्या पात्रातून हिंगोली आणि परभणी दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असतो. येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तलाठी सुभाष होळ, तलाठी धनंजय सोनवणे आणि स्थानिक पोलीस पाटील हे दिग्रस येथील धक्क्यावर गेले होते.
अज्ञात नंबरवरुन आलेला व्हिडिओ कॉल रिसिव्ह करताय?; या महिलेसोबत काय झालं पाहा...
दिग्रस येथील धक्क्यावर वाळू उपसा बंद होता, पण त्याच नदीपात्राच्या पलीकडच्या भागात अवैध वाळू उपसा सुरू होता. सदर भाग हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हुडी लिंबाळा शिवाराचा आहे, या वाळू धक्क्यावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसताच. तलाठी सुभाष होळ हे कारवाई करण्यासाठी पाण्यातून पलीकडे पोहत जात होते.
पलीकडच्या काठावर जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलाठी सुभाष होळ त्यांना पोहताना दम लागला असावा आणि ते पाण्यात बुडाले असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. घटनास्थळी परभणी येथील एनडीआरएफचे पथक त्यांचा नदी पात्रात शोध घेत आहेत. या धक्क्यावर मोठं मोठे वाळूचे साठे बघायला मिळतात. तिथून राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत असल्याने आज एका तलाठ्यावर जीव जाण्याची वेळ आली आहे.
सांगलीत जेवण बनवण्यावरुन वाद, बायकोने नवऱ्यावर केले सपासप वार; जागीच मृत्यू