Delhi Banker Women Cyber Fraud: मोबाइल आणि इंटरनेटच्या वापर हल्ली सर्रास वाढत जातोय. व्हॉट्सअॅपवर बोलणं असो किंवा डिजीटल मनी ट्रान्सफर अॅप. या माध्यमांमुळं व्यक्तीचे आयुष्य सोप्प आणि फास्ट झालं आहे. मात्र, त्याचबरोबर सायबर क्राइम (Cyber Crime) हा नवीन फसवणुकीचा प्रकारही वाढत चालला आहे. सायबर क्राइमच्या जाळ्यात फसून कित्येक जणांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी घडलेल्या एका घटनेत एका नामंवत डॉक्टर व्यक्तीला फसवून साडे चार कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे. तर, आता बँकर असलेल्या महिलेल्या खात्यातून तब्बल दोन लाख रुपये सायबर चोरांनी लंपास केले आहेत. (Cyber Fraud)
१९ मे रोजी महिलेच्या खात्यातून अचानक दोन लाख रुपये गायब झाले. महिला बँकेत काम करत असताना तिला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला. हा फोन कुरिअर कंपनीकडून असल्याचं सुरुवातीला भासवण्यात आलं. अधिक माहितीसाठी एक नंबरचा पर्याय सबमिट करा असं सांगण्यात आलं. त्यानंतर तिला तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तुमच्या नावाने असलेले कुरिअर जप्त करण्यात आले आहे, असं सांगण्यात आलं. त्यामुळं मी घाबरली होते तसंच, मला काहीच कळलं नाही माझ्यासोबत काय घडतंय. त्याआधीच मी त्यांच्या जाळ्यात फसली गेली, असं या महिलेने म्हटलं आहे.
सांगलीत जेवण बनवण्यावरुन वाद, बायकोने नवऱ्यावर केले सपासप वार; जागीच मृत्यू
आरोपींनी ते मुंबईतील एनसीबीच्या विभागातून बोलत असल्याचं म्हटलं होतं. तसंच, काही वेळाने त्यांनी तिला स्काइपवर व्हिडिओ कॉलवर बोलण्यास सांगितलं. तिने व्हिडिओ कॉल कनेक्ट करताच मागे चार ते पाच जण उभे असल्याचे दिसत होते. आरोपींनी तिला म्हटले की, तुम्हाला आलेल्या कुरुअरमध्ये पासपोर्ट, कपडे आणि ड्रग्ज सापडले आहेत. तसंच, तुमच्या विरोधात विविध कलमाअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास दोन तास आरोपी तिला अशाचप्रकारे धमकी देत होते. अखेरीस त्यांनी तिला आरबीआय तिच्या खात्याची चौकशी करु शकते, तुमचे बँक खात्याशी दहशतवाद्यांचे धागेदोरे असल्याचे पुरावे सापडले आहेत.
आरोपींनी महिलाला धमकावल्यानंतर व भीती दाखवल्यानंतर तिने आरोपींनी सांगितलेल्या खात्यात दोन लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर काहीच वेळात तिला आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे याची जाणीव झाली. तिने इंटरनेटवर याबाबत सर्च केल्यानंतर हा सर्व प्रकार आणखी एका व्यक्तीसोबत झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने लगेचच पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.
पतीचे करोना काळात निधन, दोन वर्षांनी पत्नीने कबर खोदून काढले अवशेष, कारण...